बँक संप काळात भारतीय डाक विभागाची नवी सुविधा

ठाणे (प्रतिनिधी) भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत आपल्या कोणत्याही बँकेतील खात्यामधून विनामूल्य पैसे काढण्याची सुविधा निर्माण केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ५५ पोस्ट ऑफिसव ९१ शाखा डाक घरांमध्ये मध्ये हि सुविधा उपलब्ध आहे या सुविधे द्वारे पोस्टात सर्व बँकांचे व्यवहार होऊ शकतात.काम नाही झाले तर इंडिया पोस्ट पेमेंट बँके मार्फत आधार द्वारे तुमच्या बँकेच्या खात्यातील पैसे तुम्हाला मि. शकतात आणि ते हि विनामूल्य, ठाणे विभागात ०७.०२.२०२० रोजी महा लॉगिन दिवस साजरा करण्यात येणार आहे . पोस्ट विभागाच्या मोफत सुविधांचा ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. म्हणजे आता पैसे न मिळण्याची गोष्टच नाही, आधार सक्षम पेमेंट सिस्टीम च्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही कागदाशिवाय किंवा काडाशिवाय पैसे मिळू शकतात पण अट एकच कि आधार नंबर आपल्या बँक खात्याशी जोडला गेलेला असला पाहिजे. येत्या ३१ जानेवारीला व १ फेब्रुवारीला बँकेचा संप आहे तेव्हा एटीएम मध्ये पैसे नसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गतएइपीएसद्वारे म्हणजेच आधार नंबर द्वारे लोकांना पैसे मिळू शकतात. अशा प्रकारे आधार मार्फत लोकांना गरजेला पैशाचा आधार मिळेल.