कारंजा : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळनाथ येथील दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना प्रशासनाने समाज विघातक कृत्य करणाऱ्यांसारखी वागणूक देवून मध्यरात्रीनंतर ताब्यात घेवून अटक केली. त्या सर्व बाबींचा निषेध म्हणून कारंजा तालुका पत्रकार बांधवांच्यावतीने २८ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निषेध तथा मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनानुसार वाशिम जिल्ह्यातील मंगरुळनाथ येथील दोन पत्रकारांनी महसूल प्रशासनाच्या गैरप्रकार व भ्रष्टाचारास आपल्या वृत्तपत्रातून वाचा फोडल्याचा आकस मनात ठेवून संबंधितांनी पत्रकारांविरुध्द खोटी तक्रार दाखल केली. त्यामध्ये पत्रकारांनी खंडणी मागून जातीवाचक भाषेचा प्रयोग केला त्यामुळे पोलिस प्रशासनाने दोन पत्रकारांविरुध्द अनुसूचित जातीजमाती प्रबंधक कलमान्वये तसेच खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल केले. प्रशासनाच्यावतीने आकस बुध्दीने यांनी सदर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकीकडे पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी शासन कठोर दोषींविरुध्द कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत असतांनाच दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकारी गैरकृत्य व भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्रकारांवर दडपशाही करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. संबंधित पत्रकारांना निष्कारण त्या प्रकरणामध्ये गोवण्यात आले आहे. करिता या प्रकाराची मुख्यमंत्री यांनी त्वरीत दखल घेवून पत्रकारांवरील दाखल झालेले खोटे गन्हे मागे घ्यावे, झालेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींविरुध्द कठोर कारवाई करावी अन्यथा पत्रकारांच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनक त्यामध्ये कारंजा तालुका पत्रकार संघ अध्यक्ष गोपाल पाटील भोयर, पदाधिकारी फिरोज शेक्वाले, प्रा.शेख, शाम सवाई, मनिष भेलांडे, शकील शेखविजय काळे, हामिद शेख, विलास राऊत, पवन कदम, विजय गागरेचाँद मन्नीवाले, दिपअवार, दिलीप रोकडे. दिगंबर तायडे, विनोद नंदागवळी, महेंद्र गप्ता आदींसह इतर पत्रकारांचा समावेश आहे. कारंजा येथील प्रफुल्ल बानगावकरआप्पाजी महाजन, आरीफ पोपटेसुधिर देशपांडे आदींसह इतरांचा समावेश आहे.
पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे