विरारमध्ये शरीरसौष्ठवपटूची आत्महत्या

विरारमधील प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू अली सलोमानी या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नोकरी नसल्यामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला इमारतीत राहत होता. शुक्रवारी सका ी नऊ वाजताच्या सुमारास घरात कोणी नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विरार पश्चिम उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ___ अली याने सलग तीन वेळा 'वसई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती. एकदा 'दहिसर श्री' आणि 'ज्युनियर महाराष्ट्र श्री' स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. अली सलोमनी याला व्यायामाची प्रचंड आवड होती. तो विरारमधील एका जिममध्ये ट्रेनरचेही काम करीत होता. त्याने सलग तीन वेळा वसई तालुका कला - क्रिडा महोत्सवात'वसई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकली होती.